“पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…”, शिवसेना नेत्यानं थेट उद्धव ठाकरे यांना फटकारलं
VIDEO | रत्नागिरीतील खेडच्या सभेवरून शिवसेना आक्रमक होत ठाकरे गटाला दिलं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले...
सातारा : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे राज्यसरकारवर टीका केली तसाच जोरदार हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारही केला. यावेळी त्यांनी जीभ हासडण्याची भाषा केली. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा जर तुम्ही जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे आता या सभेवरून पुन्हा वाद उफाळून येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यांनी येथील गद्दारांना याच मातीत गाडणार असल्याचा इशारा कालच्या सभेच दिला होता. त्यामुळे आता शिवसेना आक्रमक होत ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.