संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी उचलून भविष्य सांगणारा पोपट, कुणी उडवली खिल्ली
VIDEO | "उद्धव ठाकरे यांच्यावर सिल्वर ओकच्या पायऱ्या चढण्याची वेळ येते हे मनाला खटकलं"
सातारा : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासारखा माझा अजून हात बघायचा अभ्यास झालेला नाही, पहिल्या काळात जसे पोपटाच्या चिठ्ठी वरून भविष्य बघायचे त्यातील संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा भविष्य सांगणारा पोपट आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली. तर मे 2022 पर्यंत आम्ही सर्व 56 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो आमचे संख्याबळ असल्यामुळे महाविकास आघाडी बनवण्यासाठी इतरांना मातोश्रीवर यावे लागत होते लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व आहे. आज संख्याबळ घटलं आपल्या जवळचे विश्वासू आमदार खासदार निघून गेले की काय वेळ येते यामुळे उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वरून सिल्वर ओकच्या पायऱ्या चढल्या, सर्व पाहताना मनाला थोडं खटकलं, असल्याची खंतही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी तत्वता दिली मान्यता दिल्याची माहितीही शंभुराज देसाई यांनी दिली.