मंत्री शंभूराज देसाईंचा संताप, सुषमा अंधारेंसह रवींद्र धंगेकरांना थेट बजावली अब्रुनुकसानीची नोटीस

| Updated on: May 30, 2024 | 5:27 PM

पुण्यात केलेल्या या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा संताप अनावर झाला. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे

पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्यात. मात्र पुण्यात केलेल्या या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा संताप अनावर झाला. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, या नोटीसीनंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील पलटवार केला आहे. ‘जर माझ्याविरोधात कोणी हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा’, असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

Published on: May 30, 2024 05:27 PM
भाजप आक्रमक पण अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण; म्हणाले…
पुन्हा मोदी येणार? NDA की INDIA… देशात आणि महाराष्ट्रात 4 जूनला काय होणार?