Shambhuraj Desai यांचं शिवसेनेच्या पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर मोठं वक्तव्य, ‘कितीही याचिका दाखल केल्या तरी…’

| Updated on: Sep 16, 2023 | 11:32 AM

VIDEO | येत्या सोमवारी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीबाबत मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया, काय केलं भाष्य?

सातारा, १६ सप्टेंबर २०२३ | येत्या सोमवारी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सर्व न्यायप्रविष्ठ बाब आहे. प्रत्येकाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा अधिकार आहे. आमची जी न्यायाची बाजू आहे ती आम्ही मांडणार आहोत, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमक्या काय बाजू तपासल्या त्या सर्व केंद्रीय आयोग सुप्रीम कोर्टासमोर मांडेल. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये ज्या पद्धतीने न्याय मिळाला. तसा सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुणी कितीही याचिका दाखल केल्या तरी सत्याचा विजय होईल, असा विश्वास देखील मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 16, 2023 11:32 AM