गुलाबराव पाटील होणार मुख्यमंत्री? शिवसेना आमदारानं काय केला मोठा दावा?

गुलाबराव पाटील होणार मुख्यमंत्री? शिवसेना आमदारानं काय केला मोठा दावा?

| Updated on: Jun 07, 2023 | 8:35 AM

VIDEO | गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होणार? शिवसेना आमदाराच्या 'त्या' वक्तव्यानं चर्चा

जळगाव : सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री कोण होणार? किंवा भावी मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता शिंदे गटाच्या आमदारानेच मोठा दावा केला आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पुढच्या काही वर्षात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा शिंदे गटाच्याच आमदाराने केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी नेमक्या कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “गेल्या 25 वर्षात आमदार, जिल्हाप्रमुख, उपनेते, नेते, राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री असा गुलाबराव पाटील यांचा प्रवास मी पाहतोय. उद्या कदाचित गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री होतील की काय याचं मनावर दडपण आहे”, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी केलंय. गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं तर त्यांच्यासह माझेही पाय कापायला सुरुवात होईल, असेही सूचक वक्तव्य किशोर पाटील यांनी यावेळी केलं.

Published on: Jun 07, 2023 08:32 AM
श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं, म्हणाले, “ठाकरे नाईट लाईफ बाहेरुन शिकून आले असतील!”
सवयी आणि नेहमीप्रमाणे नुसती घोषणा करणारे हे सरकार; राष्ट्रवादी नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तारवरून टीका