Sudhir Munganitwar : उद्धव ठाकरे यांचं हे वैचारिक आजारपण, सुधीर मुनगंटीवार यांचा ‘त्या’ टीकेवर घणाघात

| Updated on: Oct 25, 2023 | 12:35 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या अफजल खानाबद्दलच्या भाषणात नुसचा अंगार असायचा पण तुम्ही अफजलाच्या कबरीला नमन करणाऱ्यांसोबत सत्तेत बसला

नागपूर, २५ ऑक्टोबर २०२३ | शिवतीर्थावर झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातून त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवर टीका करणे हे उद्धव ठाकरे यांचं वैचारिक आजारपण असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले तर स्वातंत्र्य लढत्या जनसंघ नव्हता, तेव्हा काग्रेसंच होती. डॅा.शामाप्रसाद मुखर्जी १९४६ पूर्वी राष्ट्रीय सरकारमध्ये होते. अटलबिहारी वाजपेयी स्वातंत्र्य लढ्यात होते. पण उद्धव ठाकरे गेले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेही स्वातंत्र्यलढ्यात गेले नाही. शिवसेना ही स्वातंत्र्यालढ्यात नव्हती कारण त्यांचा जन्म १९६६ मध्ये झालाय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचं वैचारीक आजारपण दिवसेंदिवस वाढत चाललंय असं म्हणत खोचक टीकाही केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या अफजल खानाबद्दलच्या भाषणात नुसती आग आणि अंगार असायचा पण अफजल खानाच्या कबरीला नमन करणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेत बसला आहात. तर आम्हाला उलटं टांगायचं तेव्हा टांगा पण उलटं टांगू म्हणणाऱ्यांना जनता कधीही सत्ता देत नाही, असेही म्हणत त्यांनी फटकारले.

Published on: Oct 25, 2023 12:34 PM
निलेश राणे हे आमच्यादृष्टीने कचरा, ठाकरे गटाच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
Uday Samant : मुख्यमंत्री शिंदे सोडा, माझी दखल शिवतीर्थावर…, त्या आरोपांवरून उदय सामंत यांनी काय लगावला टोला