‘ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात, त्यांची नावं…’, उदय सामंत यांचा खळबळजनक दावा
उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा सांगितला. यावेळी त्यांनी मोठा गैप्यस्फोटही केला. उदय सामंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार....
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीमध्ये अद्याप काय आहे. अशातच राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना आज माघार घेत असल्याच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी टि्वट डिलीट केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा सांगितला. यावेळी त्यांनी मोठा गैप्यस्फोटही केला. उदय सामंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट घडवून देणार आहे. हवं तर त्यांची नावं सांगतो. नंतर ते म्हणाले की, प्रवेशाच्यावेळी नाव सांगेन, असं ही उदय सामंत म्हणाले.