तर धनुष्यबाण चिन्हावर भविष्यात विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?

| Updated on: May 10, 2024 | 5:07 PM

किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल असे वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते

मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवीनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असे वक्तव्य शिवसेनेचे किरण सामंत यांनी केले आहे. किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल असे वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते. आता मात्र राजन साळवींच्या वक्तव्यावर किरण सामंत यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत आमदार राजन साळवी यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. भविष्यात लांजा राजापूर मतदारसंघ महाआघाडी कडून कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिला आहे. भविष्यात मी निवडणूक लढवली तर धनुष्यबाण याच चिन्हावर लढवेन. राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन असा इशारा देखील किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे.

Published on: May 10, 2024 05:07 PM
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना मानसोपचार…, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री… अमोल कोल्हेंचं आयोगाला पत्र, नेमकं काय म्हटलं?