छगन भुजबळ म्हणताय, मागच्या दारानं आरक्षण देण्याचं काम सरकार करतंय; यावर उदय सामंत यांचा पलटवार काय?

| Updated on: Nov 06, 2023 | 5:07 PM

राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. अशातच मागच्या दारानं आरक्षण देण्याच काम सरकार करतंय, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली होती. या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासह राज्यातील एसटी संपाच्या बैठकीवर केले भाष्य

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. अशातच मागच्या दारानं आरक्षण देण्याच काम सरकार करतंय, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली होती. या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अनेकदा राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही इतर जातीचे आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. पण मराठा समाजाचा जो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळवून देऊ’, असेही उदय सामंत यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत भाष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एसटी संपाच्या मुद्द्यावरून आज सदावर्ते यांच्याशी चर्चा केली. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या मराठा समाजाच्या भूमिकेशी सरकार किंवा मी सहमत नाही, असेही उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.

Published on: Nov 06, 2023 05:06 PM
Maratha Reservation : मराठवाड्यात किती मराठ्यांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र? जरांगेंच्या शिष्टमंडळानं सांगितला आकडा
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट, छगन भुजबळ यांचा मोठा दावा काय?