रत्नागिरीच्या नाट्यगृहातील दुरावस्थेवर भरत जाधव यांची नाराजी, उदय सामंत म्हणाले….

| Updated on: May 21, 2023 | 11:08 PM

VIDEO | रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत भारत जाधव यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया

सातारा : राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा विषय सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता वैभव मांगले यांची यासंदर्भातील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. यानंतर आता भरत जाधव यांनीदेखील रत्नागिरीमध्ये नाट्यगृहांबाबत दुरावस्था व्यक्त केली होती. यावेळी भरत जाधव यांनी परत कधी रत्नागिरीत प्रयोग करणार नाही असं सांगितलं होतं. तर रत्नागिरी येथील नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत अभिनेते भारत जाधव यानी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, भरत जाधव हे माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांनी फोन करून मला सांगितले असते तरी चाललं असते. ते कलाकार असल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. पण सभागृहाचा AC चालू होता पण तो कसा बिघडला की बिघडवला हे मी पाहतो. मी त्यांच्याशी चर्चा करतो तो माझा मतदार संघ आहे आणि जरी काही त्रुटी असतील तर त्या दूर करू, असा शब्द ही उदय सामंत यांनी यावेळी दिला.

Published on: May 21, 2023 11:08 PM
एकेकाळी ज्यांचा दरारा होता त्यांनी स्वतःहून अशी अवस्था केलीय, कुणी व्यक्त केली खंत?
सदाभाऊ खोत यांना पंतप्रधान करा, कुणी केली राष्ट्रपतींकडे मागणी?