Uday Samant : सरकारला बदनाम करण्याचा डाव होता का? मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Nov 03, 2023 | 1:57 PM

काल सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत त्यांनी आपलं उपोषण सोडलं. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटल्यानं काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाले, मंत्री उदय सामंत यांचा रोख कुणावर?

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन महिन्याची मुदत देतो असे सांगितले आणि उपोषण मागे घेतलंय. काल सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत त्यांनी आपलं उपोषण सोडलं. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे शिंदे समिती काम करेल, मराठा समाजला टिकणारं आरक्षण देण्याबाबत सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोज जरांगे पाटील हे स्वतः उपोषण करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे मनसुबे होते. मात्र जरांगे यांचं उपोषण सुटल्यानं त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत, असे सामंत म्हणाले. तर यापूर्वी २०१४ -२०१९ मराठा समजाने शांततेत आणि संयमाने लाखो मोर्चे काढले गेले. यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात ते वारंवार सांगत होते आक्रमकपणा दाखवू नका जाळपोळ करू नका, पण तरीही जाळपोळ झाली आणि कायदा व सुवस्था बिघडली. हा सरकारला बदनाम करण्याचा डाव होता का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Published on: Nov 03, 2023 01:57 PM
ठाकरे गटाच्या नेत्यांमागं ईडीचं भूत, ‘या’ खासदारानं भाजपवर साधला निशाणा
पुण्यात भाजप आक्रमक, पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू, नेमकं काय घडलं?