महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं? मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर काय झाली चर्चा?

| Updated on: Nov 24, 2024 | 2:46 PM

महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यावरून आता राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. यावरून आता राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 6 ते 7 आमदारांच्या मागे एत मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे तिनही प्रमुख नेते यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

Published on: Nov 24, 2024 02:46 PM
Ajit Pawar : सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजितदादांची मोठ्या पदावर वर्णी, सर्व आमदारांचा एकत्रित निर्णय
Kangana Ranaut : ‘… त्यामुळे दैत्यांचं तेच झालं’, ‘मविआ’च्या दारूण पराभवावर कंगना राणौत यांचा घणाघात