Mahayuti Ministry : महायुतीतून कोण होणार मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या ‘या’ नेत्यांची वर्णी, बघा संभाव्य नावं

| Updated on: Nov 25, 2024 | 2:11 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. जर भाजपचे 132 आमदार निवडून आल्याने भाजपचा सर्वाधिक वाटा असू शकतो. बघा भाजपासह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कोणा-कोणाची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आहे?

महाराष्ट्राच्या जनतेने मतदानाच्या रूपाने महायुतीसा आपला कौल दिला. आणि 230 जागांवर महायुतीचा विजय झाला. यामध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागा मिळाल्या. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. यावरून आता राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विधानसभेचं संख्याबळ हे 288 इतकं आहे. त्यात 15 टक्के मंत्रीपदाची संख्या असते. त्यामुळे राज्यात 43 जण मंत्री होऊ शकतात. त्यात 33 कॅबिनेट मंत्री तर 10 राज्यमंत्री होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. जर भाजपचे 132 आमदार निवडून आल्याने भाजपचा सर्वाधिक वाटा असू शकतो. बघा भाजपासह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कोणा-कोणाची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आहे?

Published on: Nov 25, 2024 02:11 PM
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच दिल्लीत शिक्कामोर्तब
‘माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला’, संशय व्यक्त करत भाजप आमदाराचा हल्लाबोल