मंत्री, आमदार आणि खासदारांनी Thane मधील प्रसिद्ध वडापाववर ताव मारला
ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला.
ठाणे : ठाण्यात मंत्री आणि खासदारांनी वडापाव आणि भजींवरती ताव मारला. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला आणि त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडापाववर ताव मारलाय. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ताव मारला. मात्र शेकडो वडापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्ल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचे बील भरले.