जयंत पाटील, अजित पवार यांच्या बाजूने बोलतायत का? शिंदे गटाचा दावा…जयंत पाटील सोबत येणार!
VIDEO | जयंत पाटील अजित पवार यांच्या सोबत येणार, शिंदे गटाच्या मंत्र्याचा दावा... जयंत पाटील अजित पवार यांच्या बाजूने बोलताय का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अधिक फोकस का आहे?
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | जयंत पाटील अजित पवार यांच्या बाजूने बोलताय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे. अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाही, दोघेही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत, असे जयंत पाटील म्हणाले. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अधिक फोकस का आहे? तर त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे कट्टर समर्थक अजित पवार यांच्यासोबत आलेत मात्र जयंत पाटील अद्याप आलेले नाहीत. पण जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत येतील, असे शिंदे गटाचे मंत्री छाती ठोकपणे सांगताय. जयंत पाटील यांची गेल्या काही दिवसांपासूनची वक्तव्य चकीत करणारी आहेत. कुठं जायचं असेल तर सांगून जाणार, तर नंतर म्हणाले पक्षात फूट टाळण्याचा आपण प्रयत्न करतोय. बघा नेमकं काय म्हणाले जयंत पाटील…