ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

| Updated on: Nov 29, 2021 | 12:38 PM

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे या 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधने घालण्यात आली आहे.

नवि दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. मात्र वाढत्या लसीकरणामुळे रुग्णांची संख्या घटली होती. परंतु आता कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे या 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधने घालण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका, युरोपमधील काही देश,  दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि  इस्राईल या देशांचा समावेश आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? भाजपच्या सर्व खासदारांना व्हीप जारी
चंदगड तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाचे दर्शन, शिकारीवर ताव मारणारा वाघ कॅमेऱ्यात कैद