नवी मुंबईतील ‘या’ भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय?
१२ ते १५ वयोगटातील मुलांचे अपहरण झाल्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे आणि कळंबोलीतील १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
रवी खरात, मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : नवी मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या ४८ तासात ६ अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, १२ ते १५ वयोगटातील मुलांचे अपहरण झाल्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे आणि कळंबोलीतील १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. या सहा बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला आहे तर पाच जणांचा शोध अद्याप पोलिसांकडून सुरू आहे. तर नालासोपा-यात बेपत्ता असलेल्या ८ वर्षाच्या शाळकरी मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. हत्याकरून पाय बांधून गोणीत भरून फेकलेला मृतदेह दोनदिवसांपूर्वी मिळाला आहे. वसई फाटा येथील वाण्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या एका नाल्याच्या बाजूच्या मोकळ्या रूममध्ये मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे परिसराता भितीचं वातावरण आहे.