Nagpur Violence : नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत ‘ते’ दोघे? एकाची औरंगजेब समर्थक म्हणून ओळख तर…
नागपूर राड्यातील आरोपी फहीम खानसह ५० आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या हिंसाचार प्रकरणात आणखी दोघांची नावं समोर आली असून त्यांच्यावर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटक करण्यात आलं आहे. हमीद इंजिनिअरवर नागपुरात झालेल्या हिंसाचाराचा कट रल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह युट्यूबर मोहम्मद सहजाद खान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बेड्या ठोकल्या आहेत. हमीद इंजिनिअरची औरंगजेब समर्थक म्हणून ओळख आहे. नागपुरात ज्या दिवशी हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर वास्तव्यास असल्याची माहिती आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्याने औरंगजेबानं अखंड भारत निर्माण केलं असं वादग्रस्त वक्तव्य केलं. तर औरंगजेबानं अखंड भारत निर्माण केल्याने मी त्याचं समर्थन करतो असं हमीद इंजिनिअरने म्हटलंय. इतकंच नाहीतर छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येला औरंगजेब कसा जबाबदार? असा सवलाही हमीद इंजिनिअरने यावेळी केलाय.