Mizoram Assembly Election 2023 : मिझोराममध्ये 17 डिसेंबरपूर्वीच नवं सरकार ? विधानसभेवर कोण फडकवणार झेंडा?
मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबर 2023 रोजी संपणार असल्याने राज्यात 17 डिसेंबरपूर्वीच नवं सरकार येणं क्रमप्राप्त आहे. मिझोराममधील 8 लाख 51 हजार 895 मतदार मतदान करणार
Mizoram Assembly Election 2023 : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मिझोराम राज्यात सुरू झाली आहे. मिझोरामध्ये 40 जागांवर निवडणूक होत आहे. मिझोराममध्ये एकाच टप्प्यात ही निवडणूक होत असून 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या 40 जागांपैकी 39 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. एक सीट खुल्या वर्गासाठी आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबर 2023 रोजी संपणार असल्याने राज्यात 17 डिसेंबरपूर्वीच नवं सरकार येणं क्रमप्राप्त आहे. मिझोराममधील 8 लाख 51 हजार 895 मतदार मतदान करणार असून राज्यात केवळ एकच तृतीयपंथी आहे. एमएनएफ, जेडपीएम, काँग्रेस आणि भाजप दरम्यान राज्यात मुख्य लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने पिपल्स कॉन्फ्रेन्स आणि जोरम नॅशनॅलिस्ट पार्टीसोबत मिळून आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला ‘मिझोराम सेक्युलर अलान्स’ असं नाव देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.