ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर आमश्या पाडवी म्हणाले…

| Updated on: Mar 17, 2024 | 5:21 PM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नंदुरबारचा विचार केला तर अजून तसा विकास झाला नाही. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास...

मुंबई, १७ मार्च २०२४ : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नंदुरबारचा विचार केला तर अजून तसा विकास झाला नाही. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही हा पक्ष प्रवेश करत आहेत. ज्यांनी आपल्याला आमदार केले त्यांची विनंती होती की, नंदुरबारच्या विकासासाठी आपल्याला जायला पाहिजे. आम्ही एवढे दिवस काँग्रेस सोबत होतो. पण आता अनेक जण सोबत घेऊन प्रवेश करत आहे. माझ्या अतिदुर्गम भागात जी परिस्थिती आहे. ती बदलण्यासाठी तिथले कुपोषण आणि इतर विषय सोडवण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आता प्रवेश करतोय. मी शिवसेनेत काम करत असताना दादा भुसे मार्गदर्शन करत होते. माझा मुलगा पत्नी आणि आम्ही सर्व परिवारासह आलो आहोत. माझ्या भागातील कुपोषण सोडवावे. बाळासाहेब यांच्या विचारांच्या मागे आलो आहे, असे आमश्या पाडवी यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 17, 2024 05:21 PM
अखेर ठरलं…महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, सूत्रांकडून मोठी अपडेट
हे देशद्रोहापेक्षाही खतरनाक….काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य