खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले…

| Updated on: Oct 04, 2023 | 2:33 PM

VIDEO | नांदेडच्या रुग्णालयातील घडलेल्या प्रकारानंतर आदिवासी डॉक्टरांना जबरदस्ती करून शौचालय साफ करायला लावल्याचा प्रकार घडला. या घटनेप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांची राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी म्हटलंय

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | नांदेड मधील शासकीय रुग्णालयात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाच्या डीन यांना खासदार हेमंत पाटील यांनी जबरदस्ती करून शौचालय साफ करायला लावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर याची चर्चा देखील सुरू आहे. रुग्णालयाच्या डीन हे आदिवासी आहेत. त्यामुळे त्यांना शौचालय साफ करायला लावले. दरम्यान, यावरून आमदार आमश्या पाडवी हे आक्रमक झाले आहे. नांदेडमध्ये आदिवासी डॉक्टरांना जोर जबरदस्ती करून शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे आमदार आमश्या पाडवी यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत, असेही आमश्या पाडवी यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 04, 2023 02:29 PM
राष्ट्रवादी कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार ‘हा’ सवाल
राज्यातील ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?