Ashish Jaiswal | उद्धव ठाकरेंमुळे मेलेली काँंग्रेस जिवंत झाली, त्या वक्तव्यावर आमदार आशिष जैस्वाल आजही ठाम
‘कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’ असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलं. आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे.
नागपूरमधील शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांची काँग्रेस नेत्यांवर टीका करताना जीभ घसरलीय. आशिष जैस्वाल यांनी कॉंग्रेस नेत्यांवर प्रहार केलाय. ‘कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’ असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे.