बच्चू कडू ‘मविआ’च्या वाटेवर? घेतली शरद पवारांची भेट अन् केलं सूचक वक्तव्य, म्हणाले…
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. इतकंच नाहीतर महाविकास आघाडीमध्ये जाण्यासंदर्भात बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य देखील केलं आहे. तसंच भाजपचे नेते संजय काकडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.
आधी अजित पवार यांचे आमदार नंतर एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार आणि आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत संजय काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. भाजप नेते संजय काकडेच नाहीतर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. यानंतर महाविकास आघाडीत जाण्याच्या सवालावर बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं. बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. तर ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी बच्चू कडूंच्या बदलत्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. बघा शरद पवार यांची बच्चू कडू यांनी घेतलेल्या भेटीवर कोण काय काय म्हटलं?
Published on: Aug 11, 2024 11:21 AM