Cm Eknath Shinde यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास…, बच्चू कडू यांनी काय केलं मोठं वक्तव्य?
VIDEO | एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास कोण होणार मुख्यमंत्री? आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? बघा व्हिडीओ
मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा सवाल बच्चू कडू यांना माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी विचारला असता त्यांनी मोठं विधान केल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर भाजपकडून परिणाम भोगावे लागतील, असं आमदार बच्चू कडू म्हणालेत. “लोकांचे प्लॅन वाढले तर भाजपचे कोणतेच प्लॅन कामी येणार नाहीत”, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास नेमकं कोण मुख्यमंत्री होणार यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, असं होऊ शकत नाही. कारण असं केलं तर भाजपला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल. आपण एकनाथ शिंदे यांना बाहेर काढलं, उद्या मुख्यमंत्री बदलले तर शिंदे यांचेही पाच-दहा टक्के मतं आहेत. ते सुद्धा नाराज होतील. त्यामुळे नाराजीच्या सुरात असणाऱ्यांची टक्केवारी वाढली तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत.