Bachchu Kadu यांचं मोठं वक्तव्य, ‘… म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा काहीही वक्तव्य करतात’

| Updated on: Sep 15, 2023 | 4:23 PM

VIDEO | अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे ते काहीही वक्तव्य करत असल्यची सडकून टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

अमरावती, १५ सप्टेंबर २०२३ | आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यानेच ते कोणतंही वक्तव्य करतात असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी आताच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला होता. नवनीत राणा यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांच्यावर २०१९ च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून नोटा घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या याच वक्तव्याची बच्चू कडू हे पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या या वक्तव्याच्या आधारावर सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Published on: Sep 15, 2023 04:23 PM
‘अपनों को ही खिलाऊंगा, सरकारचा नवा नारा’, कुणी केला हल्लाबोल?
‘सुना है दुश्मनों की गली में आज कल…’, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शायरीतून कोणावर साधला निशाणा?