भाजपनं शिंदेंचा बळी… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री शिंदेंवरुन भाजपवर निशाणा काय?
एकीकडे शिंदेंचे शिवसेनेतील तिकीटासाठी इच्छुक नेत्यांचे समर्थक उमेदवारीसाठी दबावतंत्र वापरताय तर दुसरीकडे शिंदेंचा बळी घेऊ नये, म्हणून प्रहारचे बच्चू कडू भाजपवर निशाणा साधताय. जागावाटपावरून जी रस्सीखेच सुरू आहे त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी शिंदेंची बाजू घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
जागावाटपावरून जी रस्सीखेच सुरू आहे त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी शिंदेंची बाजू घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. एकीकडे शिंदेंचे शिवसेनेतील तिकीटासाठी इच्छुक नेत्यांचे समर्थक उमेदवारीसाठी दबावतंत्र वापरताय तर दुसरीकडे शिंदेंचा बळी घेऊ नये, म्हणून प्रहारचे बच्चू कडू भाजपवर निशाणा साधताय. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंची अडचण होऊ नये, म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माघार घेत असल्याची पोस्ट मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी केली. तर मुख्यमंत्र्याची अडचण होऊ नये म्हणून विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय मागे घेतला. यासह रामदास कदम यांनीही यापूर्वी जागांच्या चर्चांवरून इशारा दिला होता. मात्र युतीतील वातावरण सामंजस्याचं असून अशा कोणत्याही चर्चांना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेटाळून लावले आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट