Special Report | 8 खाती एका व्यक्तीला का? मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 19, 2023 | 7:22 AM

VIDEO | मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांची पुन्हा नाराजी? काय केली मागणी, बघा स्पेशल रिपोर्ट...

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. यंत्रणेवर ताण येत असताना एकाच व्यक्तीकडे असंख्य खाती आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केली आहे. किमान एका जिल्ह्याला एक पालकमंत्री तरी द्या, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. गतिमान सरकार म्हणून महाराष्ट्र स्वतःची जाहीरात करतं. मात्र ८ महिने झालेत तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. ३० जून २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाली. त्यानंतर पुढचे दीड महिने केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोनच नेते सरकार चावलत होते. मंत्रिमंडळाशिवाय ४५ दिवस सरकार चालल्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ ला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालं आणि त्याचं खाते वाटप १४ ऑगस्टला २०२२ ला झालं. अद्याप आजही काही नेत्यांकडे ८-८ खात्यांचा कारभार असल्याने ते एकटेच ते सांभाळत आहेत. तर गेल्या ८ महिन्यांपासून शिंदे आणि फडणवीस हे दोनच नेते तब्ब्ल १७ खात्यांचा भार सांभाळत आहेत. त्यामुळे प्रशासनावरचा ताणही वाढत चाललाय कोणती खाती मुख्यमंत्री सांभाळताय आणि फडणवीसांकडे कोणती खाती सध्या आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट….

Published on: May 19, 2023 07:22 AM
बच्चू कडू यांची मंत्रिपदाची मागणी पूर्ण होईना, आता म्हणतात किमान पालकमंत्री तरी द्या!
Special Report | मुंबईत मविआचं जमलं तर लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?