Bachchu Kadu यांनी रवी राणा यांना दिला इशारा; म्हणाले, ‘…तर मी त्यांना सांगितलं असतं’

| Updated on: Sep 12, 2023 | 3:59 PM

VIDEO | आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका केली असून यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ते नाव घेऊन बोलले असते तर मी त्यांना सांगितलं असतं

अहमदनगर, १२ सप्टेंबर २०२३ | आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र दिपटे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. आमरावती रवी राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार रवी राणा यांच्यावर का हल्ला झाला हे त्यांनी तपासावं. यासाठी हल्ला झाला असेल त्यासाठी हल्ला झाला असेल अशा गोष्टी करू नये’, असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला आहे. तर कार्यकर्त्याला म्हणाले तुम्ही यशोमती ठाकूर यांच्या चप्पला चाटतात हे बोलणं चांगलं आहे का, असं कडू यांनी म्हटलंय. कोणावरी काही पण बोलायचं त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तसेच रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता टीका केली यावर बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ते नाव घेऊन बोलले असते तर मी त्यांना सांगितलं असतं, असे कडू यांनी म्हटलंय.

Published on: Sep 12, 2023 03:59 PM