‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी’, शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरलं अन् मांडली व्यथा
VIDEO | तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं..!, निफाडमधील शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांना सवाल अन् केली मागणी
नाशिक : धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरलं आहे. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवत कांद्याचे पीक भुईसपाट केले होते या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं..! असा सवाल करून भाऊ विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष कांदा उत्पादकांना न्याय द्या अशी मागणी ही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली
Published on: Mar 10, 2023 10:16 AM