Bacchu Kadu यांचं वादग्रस्त वक्तव्य अन् नंतर माफी; म्हणाले, ‘XXXX हे सुद्धा आमदार होतात’
VIDEO | प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरली अन् केलं 'ते' वादग्रस्त वक्त्य पण नंतर जोडले हात, बघा व्हिडीओ काय म्हणाले
जळगाव, १८ सप्टेंबर २०२३ | आमदार बच्चू कडू काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे विरोधकांकडून एकच हल्लाबोल करण्यात येत आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ज्याच्या बोलण्यात दम नसतो, त्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही , असेही लोक आमदार होतात. तर हिजडे सुद्धा आमदार होतात, अस वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले. दरम्यान, यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली, आंडू-पांडू लोकही आमदार होतात असा माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे, असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
Published on: Sep 18, 2023 10:47 AM