बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?

| Updated on: Sep 25, 2024 | 11:33 PM

मुंबईतील मंत्रालयासमोर बच्चू कडू यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरूच आहे. भर पावसात बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचं भरपावसात आंदोलन सुरूच आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर जोपर्यंत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ‘ज्याला हात नाही पाय नाही त्याने जगावं कसं? 1500 रूपये या महागाईच्या जमान्यात कसं जगावं? एका घरात चार चार दिव्यांग असतात. त्यांचं कुटुंहच रस्त्यावर येईन जातं. त्यामुळे पेन्शन वाढवण्याचं आणि ते पण वेळवर भेटण्याची मागणी आमची आहे’, असं बच्चू कडू म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, अजित पवार यांनी सांगितले होते, महिन्याच्या पाच तारखेच्या आत पेन्शन देणार, नाही दिलं तर आम्ही वित्त सचिवालयाचा पगार रोखणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला. आता तीन महिन्यांपासून दिव्यांगांचं पेन्शन नाही, आमदार, अधिकाऱ्यांचं पेन्शन मिळतं मग दिव्यांगांचं का नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी सरकारला केला आहे.

Published on: Sep 25, 2024 11:33 PM
Mumbai Rain Update : मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
शिवसेना खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा,इतका कारावास आणि दंड