‘काका-पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढतायत’, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर कुणाची सडकून टीका?

| Updated on: Aug 25, 2023 | 6:13 PM

VIDEO | 'राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या सर्व सुरू असलेली खेळी पाहिली आणि जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल', कुणी लगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना खोचक टोला?

कोल्हापूर, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान केलं आणि अवघ्या पाच तासातच शरद पवार यांनी युटर्न घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या सर्व घडामोडींवर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. काका – पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत का? असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांना माध्यमांनी केला असता बच्चू कडू यांनी आपली थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘काका – पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढत आहे हा काय प्रश्न आहे का? हे सुर्य प्रकाशाइतकं सत्य आहे. त्यात प्रश्न विचारण्याची गरज काय?’, असे म्हणत बच्चू कडू यांनी माध्यमांनाच सवाल केला आहे. शरद पवार जे म्हणतात ते शरद पवार करत नाहीत किंवा ते जे बोलतात त्यांनी तसं कधीच केल्याचं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या सर्व सुरू असलेली खेळी पाहिली आणि जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. एकीकडे काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही म्हणतात तर दुसरीकडे नोटीस देतात, हा सगळा गेम आहे, असं मोठं भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे.

Published on: Aug 25, 2023 06:13 PM
‘मग राष्ट्रवादीत ही फूट नव्हे तर काय?; संजय राऊत यांनी थेट सवाल करत केलं मोठं वक्तव्य
शरद पवार यांना भेटायला आलेल्या चिमुकल्यानं वेधलं सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलं बेधडक भाषण