शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर पाऊल पण… बच्चू काय म्हणाले?
'ज्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं. भाजप कार्यकर्त्यांना मारलं होतं. काय दुर्दैवी वेळ येते, अशी लाचारी तर कुणावर येऊच नये, ज्यांनं भाजप अमरावतीचं कार्यालय फोडलं. आता त्यांच्यावर तुम आगे बढो....हम तुम्हारे साथ है.. अशी म्हणण्याची वेळ येते..', बच्चू कडूंचा टोला
भाजपचे झेंडे ज्यांनी हाती घेतली, मेहनत घेतली, ज्यांच्यावर प्रभू श्रीरामासाठी गुन्हे दाखल आहेत. ज्यांच्या घरातून लोकं शहिद झालेत, त्याचा विचार भाजपमधून संपलाय. रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं. भाजप कार्यकर्त्यांना मारलं होतं. काय दुर्दैवी वेळ येते, अशी लाचारी तर कुणावर येऊच नये, ज्यांनं भाजप अमरावतीचं कार्यालय फोडलं. आता त्यांच्यावर तुम आगे बढो….हम तुम्हारे साथ है.. अशी म्हणण्याची वेळ येते तर स्वाभिमान, अभिमान गेला अन् संविधानपण डुबवलं… आणि अशा लोकांना उमेदवारी दिली जातेय. त्याविरोधात आम्ही आहोत. अशा उमेदवाराच्या विरोधात आम्ही आमची ताकद उभी करू, असा शब्दच आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. पुढे ते असेही म्हणाले, घरात घुसून मारण्याची भाषा, कुठे गेलो तर आम्ही पैसे खातो अशी भाषा…आता दाखवतो पैसात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात, असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट आव्हान दिलंय. दिव्यांगाबाबत एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला गेलो नाहीतर पाऊलही टाकलं नसत, असेही ते म्हणाले.