तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू… आधी टीका नंतर स्पष्टीकरण, काय म्हणाले बच्चू कडू?
अजूनही तुम्हाला आमच्याकडून कामे करून घ्यायचे असतील तर प्रहारचे सर्वाधिक जास्त आमदार विधानसभेत पाठवा, अशी मागणी काल प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली होती. नाहीतर मुख्यमंत्र्याचा गणपती बनवू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली होती.
आम्ही सर्व सामन्यासाठी काम करतोय, अजूनही तुम्हाला आमच्याकडून कामे करून घ्यायचे असतील तर प्रहारचे सर्वाधिक जास्त आमदार विधानसभेत पाठवा, अशी मागणी काल प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली होती. नाहीतर मुख्यमंत्र्याचा गणपती बनवू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली होती. ते कळमनुरी येथील शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते. दरम्यान, काल टीका केल्यानंतर आज त्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी अमरावती माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत आमचे 20 आमदार जर निवडून आले आणि जर शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय झाले नाहीत. तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू असा म्हणण्याचा अर्थ होता. कारण मुख्यमंत्र्यांना उचलायला तर पाच सहा आमदार पाहिजे ना… म्हणून लोकांना अपील केली होती, असे बच्चू कडू यांनी म्हटलंय. दरम्यान, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.