बंडखोर कौन नही है, जरा … आमदार अपात्रतेच्या निकालावर बच्चू कडू यांचं मिश्किल भाष्य
पाच वर्षांत जातीय वातावरण देशभरात तयार होत आहे. अंधश्रद्धा पुन्हा वाढली आहे. तर कोर्टाच्या निकालाच्या विचार केला तर राजकीय वर्तुळात ढवळून निघालं आहे. बंडखोर कौन नही है मुझे बताओ जरा..असं मिश्कीलपणे वक्तव्य करत आमदार बच्चू कडू यांनी निकालावर भाष्य केले
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : शिवसेना पात्र आणि अपात्र आमदारांवरील निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून राज्यात असणाऱ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. पाच वर्षांत जातीय वातावरण देशभरात तयार होत आहे. अंधश्रद्धा पुन्हा वाढली आहे. तर कोर्टाच्या निकालाच्या विचार केला तर राजकीय वर्तुळात ढवळून निघालं आहे. बंडखोर कौन नही है मुझे बताओ जरा..असं मिश्कीलपणे वक्तव्य करत आमदार बच्चू कडू यांनी निकालावर भाष्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, मी तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच बोलणार. शिवसेना ठाकरे गट पक्षाने त्यावेळी योग्य पाऊलं उचचले नाही म्हणून आज एकनाथ शिंदे यांना त्याचा फायदा झाला. त्यावेळी पक्ष बघणाऱ्यांनी बैठक, ठराव या गोष्टी कळवायला पाहिजे होत्या मात्र ते झालं नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.