‘किस गली में खस-खस है, आग लग गई तो धुव्वा उडणे वाला है; बच्चू कडू यांचा रोख कोणावर?

| Updated on: Sep 01, 2024 | 12:33 PM

मी आलतू-फालतू माणसांवर बोलत नाही. आधी रवी राणा बोलायचे म्हणून नवनीत राणा पडल्या आणि आता नवनीत राणा बोलताय त्यामुळे रवी राणा पडणार असल्याचे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. नवनीर राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला बच्चू कडू यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे.

Follow us on

भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्या मतदार संघात जाऊन बच्चू कडू यांच्यावरच टीका केली. सुपारी बहाद्दर काही बेईमान लोकं आहे. घरात राहून घरातील लोकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार आहेत. ज्या मतदारांनी मला साथ दिली त्याला थांबवण्याचं काम काही बेईमान लोकांनी केलंय. आपल्याला सुपारी बहाद्दरचा हिशोब करायचा आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच नाव न घेता पुन्हा टीका केली. तर यावर बच्चू कडू यांनी पलटवार केलाय. ‘आलतू फालतू लोकांवर आम्ही बोलत नाही. आधी रवी राणा बोलत होते म्हणून नवनीत राणा पडल्या आहे. आता नवनीत राणा बोलत आहे तर तो रवी राणा पडणार आहे. हम शिकार शेर की करते है, ये किस गली की खस खस है.? असं म्हणत बच्चू कडू यांनी खोचक टीका केली. आधी आम्ही 2 आमदार निवडून आलो होतो आता आम्ही 10 आमदार निवडून आणणार आहे. राज्याची सरकार चांदुर बाजार मधून चालवू, असे म्हणत तुम्ही दोघांनी तर अख्खा जिल्हा खराब केला, विकासाच्या गोष्टीवर समोरासमोर स्टेजवर येऊन चर्चा कर म्हणा. बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला आव्हान दिलंय.