Bachchu Kadu : ‘माझा अपघात…’, बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना काय लिहीलं पत्र?

| Updated on: Jun 21, 2024 | 2:45 PM

माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन सुरू.....

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणानंतर सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे.

Published on: Jun 21, 2024 01:16 PM
International Yoga Day : आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले…
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची कोणाकडे विनंती?