‘तुमच्या बापाचं राज्य आहे का X@#…’, संतोष बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली

| Updated on: Aug 06, 2024 | 5:11 PM

तुमचं संडास बाथरूम पाच लाखांचं अन् आमचं घर सव्वा लाखाचं... लाज नाही वाटत का नाही तुम्हाला? घेतली कावड की निघाला महादेवाला अरे महादेव त्रिशुळ घालेस की ढुंX@# असे म्हणत बच्चू कडू यांनी आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

तुमच्या बापाचं राज्य आहे का साल्यानो… तुमचं संडास बाथरूम पाच लाखांचं अन् आमचं घर सव्वा लाखाचं… लाज नाही वाटत का नाही तुम्हाला? असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर करत आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले की, हे कोणी विचारत नाही, घेतली कावड की निघाला महादेवाला अरे महादेव त्रिशुळ घालेस की ढुंX@# असे म्हणत बच्चू कडू यांनी आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. तर आपली लढाई गोर-गरीब, कष्टकरी शेतकरऱ्यांची आहे, 50 माणसं घेऊन जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हरला 12 हजार रुपये महिना आणि 1 माणूस घेऊन जातो त्या कलेक्टरच्या ड्रायव्हरला 45 हजार रुपये महिना भेटतो… अरे सालो तुम्हारे बाप का राज है, बच्चू कडू अभि जिंदा है, उखाड के फेकना है इन लोगो को… असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधला आहे.

Published on: Aug 06, 2024 05:11 PM
तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू… आधी टीका नंतर स्पष्टीकरण, काय म्हणाले बच्चू कडू?
“राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक?, प्रबोधनकारांच्या घरात जन्म पण तरीही…” लक्ष्मण हाके भडकले