Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू 29 तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार, ‘या’ आंदोलनाची घोषणा

| Updated on: Oct 22, 2023 | 5:03 PM

VIDEO | शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांची पुन्हा आक्रमक भूमिका, येत्या 29 तारखेला बच्चू कडू हे अयोध्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार यावं. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणं व्हावीत म्हणूनअयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले

अमरावती, २२ ऑक्टोबर २०२३ | एकीकडे मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक झालाय, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला दोन दिवस बाकी असताना आता आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले असून आता त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर येत्या 29 तारखेला बच्चू कडू हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 29 तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार असून प्रभू रामाचं दर्शन घेणार आहोत. प्रभू रामचंद्रला कापूस,ऊस, संत्रा, तूर ,सोयाबीनचा प्रसाद चढवणार आहोत. या सरकारला बुद्धी दे, ही प्रार्थना प्रभू रामाकडे करणार आहोत आणि आर्थिक आरक्षणाची आम्ही लढाई सुरू करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. तर आता आर्थिक आरक्षणाची लढाई सुरू करणार आणि आम्ही संपूर्ण भारतभर फिरणार आहोत. शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचं आर्थिक आरक्षण निर्माण व्हावं. यासाठी आमची लढाई असणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

Published on: Oct 22, 2023 05:03 PM
Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र दिलं तरी…, मागासवर्गीय आयोगाचं मोठं वक्यव्य
ती विदर्भातील कुणबी, तो मराठवाड्यातील मराठा, मग मुलगा कोण? कुणबी मराठा वाद कुणी पेटवला?