कुणालाही मंत्री करा पण…, बच्चू कडू यांनी काय केला मोठा दावा?

| Updated on: May 12, 2023 | 2:51 PM

VIDEO | राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आमदार बच्चू कडू यांनी थेट सांगितली तारीख

अमरावती : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायायलाने दिला. महिन्याभरापासून राखून ठेवलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाने शिंदे-फडणवीस सरकारला अभय मिळाले आहे. या निकालानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet expansion) गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण दूर झालेली दिसतेय, अशी आशा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.  शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताचे वेध लागले आहेत. अशातच बच्चू कडू यांनी येत्या २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा मोठा दावाही  केला आहे. राज्यात विकास कामं करायची असतील तर मंत्रिमंडळ विस्तार होणं आवश्यक आहे. ज्याला कुणाला मंत्री करायचं असले त्याला करा, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा, अशी विनंतीच बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे. तर राज्याला व्यापक पद्धतीने मंत्रिमडळाची गरज आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

Published on: May 12, 2023 02:51 PM
अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसानंतर उन्हाचा तडाखा! पारा गेला 40 शी पार
पुणेकरांनो घराबाहेर पडताय? काळजी घ्या, तापमानात होणार मोठी वाढ?