…म्हणून मी सूरतला गेलो, छत्रपती शिवरायांचं नाव घेत सुनावणीदरम्यान दिलं उत्तर अन् विरोधक पेटले
भरत गोगावले सूरत मधल्या हॉटेलात आमदारांनी जमणं पूर्वनियोजित होत का? असा प्रश्न ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी गोगावले यांना विचारला. यावर ते म्हणाले ते मला माहित नाही, शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मी सुद्धा सुरतला गेलो.
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : छत्रपती शिवाजी महाराज सूरतेला गेले होते. म्हणून आपणही सूरतला गेलो होतो, असे उत्तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सुनावणीदरम्यान दिलं. त्यांच्या या विधानाने नवा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भरत गोगावले सूरत मधल्या हॉटेलात आमदारांनी जमणं पूर्वनियोजित होत का? असा प्रश्न ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी गोगावले यांना विचारला. यावर ते म्हणाले ते मला माहित नाही, शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मी सुद्धा सुरतला गेलो. एका बंडाची तुलना भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेशी केली. त्यांच्या या तुलनेवरून वाद सुरू झालाय. मात्र कोणतंही चुकीचं वक्तव्य केले नसल्याचे गोगावले यांनी म्हटले. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याची सुटकेची तुलना भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली होती. मात्र वाद होताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.