लोकशाही कशी संकटात ‘या’ नेत्यानं सांगितलं कारण, राजकीय संकटांसंबंधी काय वर्तविली शक्यता?

| Updated on: Mar 04, 2023 | 9:45 PM

VIDEO | शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आयोगानं शिंदेंना दिल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत देशातील लोकशाही संकटात आणि धोक्यात असल्याचं मत व्यक्त केलं, बघा व्हिडीओ

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर अद्याप विरोधकांकडून आरोप आणि टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप विरुद्ध गटातील अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले होते. तर ठाकरे गटाने या निर्णयावरून देशातील लोकशाही कशी धोक्यात आली आहे असं मत व्यक्त केले गेले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत देशातील लोकशाही संकटात आहे धोक्यात आहे असं मत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, त्यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगानं गद्दारांना दिलं म्हणून लोकशाही संकटात आहे, असे म्हणत सर्वश्रेष्ठ असणारे संविधान आणि घटनेलाही पायदळी तुडवले जात असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

Published on: Mar 04, 2023 09:44 PM
ठाकरे गटाच्या नेत्यानं उद्या होणाऱ्या रत्नागिरीतील सभेचं थेट सांगितलं कारण अन् भाजपला दिला इशारा, बघा व्हिडीओ
‘कितीही आमदार, खासदार गेले तरी…’, ठाकरे गटानं पुन्हा विरोधकांना फटकारलं, बघा काय केला हल्लाबोल