Rahul Narvekar LIVE : अपात्र कोण, ठाकरे की शिंदे? महानिकालाचं वाचन सुरू

| Updated on: Jan 10, 2024 | 5:39 PM

Maharashtra Shivsena MLA Disqualification Results LIVE News in Marathi : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली होती. या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर कोणात्या गटाचे आमदार अपात्र होणार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे? याचा महाफैसला होणार

मुंबई, १० जानेवारी, २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली होती. या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर कोणात्या गटाचे आमदार अपात्र होणार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे? याचा महाफैसला होणार आहे. त्या महानिकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुरू आहे. शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावरील निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणाले, दोन्ही गटाने वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही. निवडणूक आयोगाने एक घटना दिली, पण त्यावर तारीख नाही. २०१८ ला घटनेत जी दुरुस्त केली ती चूक तर २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवला नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले तर प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नसल्याचेही राहुल नार्वेकर यांनी या निकाल वाचनाच्या वेळी म्हटले आहे.

Published on: Jan 10, 2024 05:33 PM
वरून स्क्रिप्ट पाठवली तिच वाचणार, विजय वडेट्टीवार यांची अपात्रतेच्या निकालावर थेट प्रतिक्रिया
राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी