ठाकरे गटाला ‘या’ जिल्ह्यातही मोठा धक्का, माजी आमदाराचं संचालकपद गेलं; काय आहे कारण?
VIDEO | राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाला मिळणाऱ्या राजकीय धक्क्यांत आणखी एक धक्का, या जिल्ह्यात माजी आमदाराचं संचालकपद गेलं
उस्मानाबाद : राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर ठाकरे गटाला मिळणाऱ्या राजकीय धक्क्यांत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथे उद्धव ठाकरे गटाला उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा धक्का बसला असून भूम परंडा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे संचालक पद अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना 2 पेक्षा जास्त आपत्य असल्याचे कारण देत ज्ञानेश्वर पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद गेले आहे. तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.
Published on: Feb 24, 2023 08:29 AM