Eknath Khadse : एकनाथ खडसे यांची डायलॉगबाजी, म्हणाले… मैं झुकने वाला नहीं हूं

| Updated on: Oct 22, 2023 | 1:31 PM

VIDEO | आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी खडसेंना १३७ कोटी १४ लाखांचा दंड आकारला आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. डायलॉगबाजी करत म्हणाले...

जळगाव, २२ ऑक्टोबर २०२३ | शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी खडसेंना १३७ कोटी १४ लाखांचा दंड आकारला आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. कारवाई करणाऱ्यांबद्दल खडसे म्हणाले, हे आपणच वाढवलेले पिल्लं आहेत साथ सोडली म्हणून मागच्या दाराने हे टिका करतात. 137 कोटींची मला नोटीस पाठवतात लेकिन नाथाभाऊ झुकने वाला नहीं हूं… ना झुकूंगा.., असे म्हणत नाव न घेता गिरीश महाजन आणि विरोधकांवर एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांच्या हातून केळी पीक विम्याच्या उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडण्यात आलं. तर पिक विम्याबाबत धनंजय मुंडे यांना भेटणार असल्यासही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Published on: Oct 22, 2023 01:30 PM
Sanjay Raut : भाजप गुंड आणि गुन्हेगारांचा पोशिंदा, संजय राऊत यांनी काय केली सडकून टीका?
Manoj Jarange Patil : …तर आरक्षण कुणाला द्यायचं? जरांगे यांनी मराठा समाजील तरूणांना काय केलं आवाहन?