Gopichand Padalkar | सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस : गोपीचंद पडळकर

| Updated on: Dec 12, 2021 | 5:24 PM

प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे. एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी ह्यांना काहीही देणंघेणं नाही. म्हाडा भरती परिक्षा रद्द केल्यानंतर पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला.

मुंबई : प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात.  पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरीबाबत लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार अस स्वतःच सांगत त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करत आहेत. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली ? आमदार गोपीचंद पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल. प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे. एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी ह्यांना काहीही देणंघेणं नाही. म्हाडा भरती परिक्षा रद्द केल्यानंतर पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला.

Pune | पेपर लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर सेलची कारवाई
Pankaja Munde | पालकमंत्री फक्त बँनरवर दिसतायेत, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका