Jitendra Awhad Video : ‘… मग याच न्यायानं वाल्मिक कराडलाही माफ करायचं?’, जितेंद्र आव्हाडांचा सुरेश धसांना थेट सवाल

Jitendra Awhad Video : ‘… मग याच न्यायानं वाल्मिक कराडलाही माफ करायचं?’, जितेंद्र आव्हाडांचा सुरेश धसांना थेट सवाल

| Updated on: Feb 10, 2025 | 5:30 PM

परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असं सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसताय. तर काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचं असतं, असंही सुरेश धस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून शरद पवार गट राष्ट्रवादीतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये, परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असं सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसताय. तर काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचं असतं, असंही सुरेश धस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आव्हाडांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मग याच न्यायाने वाल्मिक कराडलाही माफ करायचं का?’, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाडांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय, दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे. सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे… अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही, असं आव्हाडांनी म्हटलं.

Published on: Feb 10, 2025 05:30 PM
Pankaja Munde Video : ‘मंत्री असले काय, नसले काय मला…’, वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या….
HSC Board Exam Video : पोरांनो…ऑल द बेस्ट! 12 वीची परीक्षा उद्यापासून अन् ‘या’ दिवशी लागणार रिझल्ट