Special Report | पाचोऱ्यात बहिण-भावात राजकीय संघर्ष, आगामी निवडणुकीत कोण येणार आमने-सामने?
VIDEO | पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून आर ओ पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन तर त्याच पुतळ्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : जळगावच्या पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी सभा घेत आर ओ पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. शिंदेच्या शिवसेनेनं त्याच पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलं. पाचोऱ्यातील पुढच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांना त्यांच्याच बहिणीचं आव्हान असण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या सभेनंतर हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत आमदार किशोर पाटील यांनी आपणच आर ओ पाटील यांचे खरे वारसदार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. किशोर पाटील यांची चुलत बहिण आणि आर ओ पाटील यांची कन्या वैशाली पाटील सुर्यवंशी सध्या ठाकरे गटात आहेत. त्यामुळे पाचोऱ्यातील येत्या निवडणुकीत बहिण- भावांत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोप केलाय. जसे आनंद दिघे यांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत तसेच आर ओ पाटील यांचे खरे वारसदार किशोर पाटील असल्याचा दावा त्यांनी केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट