विद्यार्थ्यांच्या विधानभवन दौऱ्याचं आयोजन अन् आमदारच बनले एसटी बसचे चालक

| Updated on: Mar 20, 2023 | 4:18 PM

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावातील विद्यार्थ्यांचा विधान भवन दौरा आमदारांनी आयोजित केला होता यावेळी त्यांनी एसटी बस चालवली अन् व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

जळगाव : चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एसटी चालवलेली आहे. त्यांचा राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस चालवताना व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावातील विद्यार्थ्यांचा विधान भवन दौरा आमदारांनी आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मुंबईकडे घेऊन जाणारी एसटी बस आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः चालवली आणि चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण बस चालक बनल्याचे दिसून आले. यावेळचाच त्यांचा बस चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. विधान भवन पर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्यांचा नेता कैसा हो, मंगेश दादा जेसा हो, मंगेश चव्हाण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…असे म्हणत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळाले.

Published on: Mar 20, 2023 04:15 PM
नादचं न्हाय करायचा! पत्नीच्या वाढदिवसाला पठ्ठ्यानं दिलं थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचं सरप्राईझ
अवकाळीनं साताऱ्यात धुक्याची चादर, बघा मन प्रफुल्लित करणारं दृश्य