‘ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी ते आमच्याच पक्षात येतील’, शिवसेना नेत्याचा दावा

| Updated on: May 31, 2023 | 1:23 PM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा कार्यकाळ संपत आलाय, कुणी केला मोठा गौप्यस्फोट

संभाजीनगर : नऊ वर्षात नरेंद्र मोदी सरकारने जनतेला काय दिलं. त्यांचे हे नऊ वर्ष त्यांच्या नाकीनऊ आणणार आहेत. इतकं सगळं होतं मग निवडणुका का घेत नाहीत. याचे उत्तर आता सरकारने द्यावे. तसेच शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. काही लोकांना प्रसिद्धी हवी असते त्यामुळे ते खोटे बोलत असतात. ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून ते निवडणुकीआधी आमच्याच पक्षात येतील, असा दावा शिरसाट यांनी केलाय. तर संजय राऊत यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. खोटं बोलत असाल तर खोटे हास्य आणावे लागते. असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

 

 

Published on: May 31, 2023 01:23 PM
“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कोणी लागू नये”, रोहित पवार यांचा इशारा; “राम शिंदे यांनी…”
इंद्रायणी फेसाळली, रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्यावर प्रश्नचिन्ह